ब्रिटिशांच्या काळात दक्षिणी हिंदु्स्थानात एकूण ३० मराठीभाषिक जिल्हे होते. त्यांतले कारवार आणि बेळगाव हे सध्या कर्नाटकात आहेत. उरलेल्या जिल्ह्यांचे विभाजन करून आता बरेच नवे जिल्हे झाले आहेत.

यापूर्वी झालेली जिल्हा विभाजने

रत्‍नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा केला - १ मे १९८१ औरंगाबाद जिल्ह्यातून जालना जिल्हा वेगळा केला – १ मे १९८१
उस्मानाबाद मधून लातूर वेगळा केला – १६ ऑगस्ट १९८२[१]
चंद्रपूर मधून गडचिरोली वेगळा केला – २६ ऑगस्ट १९८२
बृहमुंबई जिल्ह्यातून मुंबई उपनगर जिल्हा वेगळा केला – ४ ऑक्टोंबर १९९०
अकोला जिल्ह्यातून वाशीम वेगळा केला – १ जुलै १९९८
धुळे जिल्ह्यातुन नंदुरबार वेगळा केला – १ जुलै १९९८
परभणी जिल्ह्यातून हिंगोलीची निर्मिती केली – १ मे १९९९
भंडारा जिल्ह्यातून गोंदियाची निर्मिती केली – १ मे १९९९
ठाणे जिल्ह्यातून पालघरची निर्मिती झाली -१ ऑगस्ट २०१४

नामबदल

काही जिल्ह्यांची नावे बदलली आहेत.

जुने नाव नवे नाव
कुलाबा रायगड
उत्तर रत्‍नागिरी रत्‍नागिरी
दक्षिण रत्‍नागिरी सिंधुदुर्ग
पश्चिम खानदेश धुळे
पूर्व खानदेश जळगांव
उत्तर सातारा सातारा
दक्षिण सातारा सांगली

संदर्भ संपादन

  1. ^ "जिल्हा प्रोफाईल". २१ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.