जायकवाडी पक्षी अभयारण्य

Jayakwadi Bird Sanctuary (en); जायकवाडी अभयारण्य (mr); जायकवाड़ी पक्षी अभयारण्य (hi)

जायकवाडी पक्षी अभयारण्य पैठणजवळील नाथसागर जलाशयाला लागून असलेल्या सुमारे ३४० किमी क्षेत्रावर पसरलेले आहे. सागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे. जायकवाडी धरणाचे काम १९६५ मध्ये सुरू झाले. १९७६ मध्ये पूर्ण झाल्यानंतर येथे पाणी साठवण्यास सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, पैठण, अहमदनगर जिल्ह्यातील [[शेवगाव[[ व नेवासे तालुक्यातील मिळून ११८ गावांमधील ३४ हजार १०५ हेक्टर क्षेत्रात धरणाचा परिसर आहे.जायकवाडी धरणाची तब्बल १०२ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि ४ वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. मात्र, जायकवाडी नियमित येणा-या पाण्यामुळे धरणात गाळासह वाळू मोठ्या प्रमाणात आल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता १०२ टीएमसीवरून ८७ टीएमसीवर आल्याचा अहवाल नाशिकच्या '[१]मेरी' या संस्थेने २०१२ मध्ये दिला होता आता त्या अहवालास बारा वर्ष झाले असून आता अंदाजे पाणी साठवणी क्षमता साठ टीमसीपर्यंत पर्यंत पोहचली असेल. १९८६ मधे जायकवाडी धरणास पक्षी अभयारण्य पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 घोषित करण्यात आले. तर, २०१७ मधे जायकवाडीचा नाथसागर परिसर प्रतिबंधित क्षेत्र आहे. राष्ट्रीय पर्यावरण धोरण (2006) ने इको-सेन्सिटिव्ह झोनची व्याख्या "परिस्थिती, वन्यजीव, जैवविविधता, ऐतिहासिक आणि नैसर्गिक मूल्ये यामुळे "अतुलनीय मूल्ये असलेले ओळखले जाणारे पर्यावरणीय संसाधने असलेले क्षेत्र/झोन" म्हणून केले आहे. संरक्षित क्षेत्राच्या बाहेरील क्षेत्राचे पर्यावरण आणि जैविक अखंडतेचे संरक्षण करण्यासाठी आणि इतर अशा क्षेत्रांमध्ये जेथे मानववंशजन्य आणि हवामान घटकांमुळे पर्यावरणीय प्रणालीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अशी घोषणा केली आहे. इको-सेन्सिटिव्ह झोन/क्षेत्रे म्हणून क्षेत्र. दुस-या शब्दात, हे एखाद्या क्षेत्राचे पदनाम आहे, जे पर्यावरणीय संसाधनांनी समृद्ध आहे आणि विशेष संरक्षणाची आवश्यकता आहे.

जायकवाडी अभयारण्य 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
उच्चारणाचा श्राव्य
प्रकारपक्षी अभयारण्य
स्थान भारत
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr