चुन्याचा मारुती (शहापूर)

कऱ्हाड-मसूर रस्त्यावर कऱ्हाडपासून सुमारे १० कि.मी. अंतरावर शहापूर फाटयापासून जवळच नदीच्या किनाऱ्यावर स्थापिलेली ही मूर्ती आहे मूर्ती जवळपास ६ फूट उंच असून ह्या मारुतीस शहापूरचा चुन्याचा मारुती म्हणतात. या मूर्तीच्या डोक्यावर गोंडा लावलेली टोपी आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे.

शहापूरचे बाजीपंत कुलकर्णी यांची पत्‍नी सईबाई हिची निष्ठा पाहून समर्थांनी त्यांना शके १५६७ मध्ये शहापूर येथे चुन्याचा मारुती स्थापून दिला. हा मारुती रामदास स्वामींच्या अकरा मारुतींपैकी एक आहे.