चित्रपट उद्योग किंवा मराठीत सहसा चित्रपट सृष्टी असे संबोधतात. चित्रपट उद्योगात प्रामुख्याने चित्रपट निर्मितीतील तांत्रिक आणि व्यावसायिक संस्थाचा समावेश होतो. जसे, निर्मिती संस्था, चित्रपट स्टुडिओ, छायाचित्रीकरण, चित्रपट निर्माण, पटकथालेखन, पूर्वनिर्मिती, पोस्ट प्रॉडक्शन, चित्रपट महोत्सव, वितरण, आणि कलाकार.

Cinema admissions in 1995

भारत संपादन

भारतीय चलचित्रपट ह्यात प्रामुख्याने भारतभर पसरलेल्या विविध भाषांतील चित्रपटांचा समावेश होतो. भारतीय चित्रपटांत आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल ह्या राज्यातील चित्रपट संस्कृतीचा आंतर्भाव होतो.मुंबई हे भारतातील सर्वात मोठे चित्रपट निर्मिती केंद्र म्हणुन विकसीत होत आहे, ते मुख्यत्वे करून हिंदी भाषामराठी भाषेतील चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे.भारतीय चित्रपटांची मागणी दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियातील देशांत अधिक प्रमाणात आहे. एक प्रसिद्ध माध्यम असल्याकारणाने भारतात सर्वसाधारणपणे सर्व भाषांतील मिळून १०००हून अधिक चित्रपटांची निर्मिती होत असते. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये विशेषतः इंग्लंड आणि अमेरीकेतील प्रेक्षकांमध्ये हिंदी भाषा,तमिळ,तेलुगू,मल्याळम आणि बंगाली भाषेतील चित्रपटांची रेलचेल असते.

हॉंगकॉंग संपादन

 
Zhuangzi Tests His Wife

 
Still image from The Story of the Kelly Gang
 
The Hollywood Sign as it appears today.