@अभय नातू: सध्या गावांबद्दलचे लेख मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात येत आहेत, असे दिसते. या लेखांना सध्या 'महाराष्ट्रातील शहरे आणि गावे' , 'एखाद्या जिल्ह्यातील गावे' आणि 'एखाद्या तालुक्यातील गावे' असे सर्व वर्ग जोडलेले दिसतात. उदा.हाच लेख. खरेतर 'महाराष्ट्रातील शहरे आणि गावे' यामध्ये सर्व जिल्ह्यांचे वर्ग आणि प्रत्येक जिल्ह्याच्या वर्गात त्यातील तालुके आणि त्यात प्रत्येक तालुक्यातील गावे असा वर्ग अशी रचना असायला हवी आणि लेखाला वर्ग जोडताना सर्वांत खालचा वर्ग जोडला जावा, असे मला वाटते. वर्गांची योग्य रचना कशी हवी, याबद्दल आपण मार्गदर्शन केल्यास मला हे वर्ग सुव्यवस्थित करायची इच्छा आहे. --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १८:०९, ४ ऑगस्ट २०२० (IST)Reply

@ज्ञानदा गद्रे-फडके:
'महाराष्ट्रातील शहरे आणि गावे' यामध्ये सर्व जिल्ह्यांचे वर्ग आणि प्रत्येक जिल्ह्याच्या वर्गात त्यातील तालुके आणि त्यात प्रत्येक तालुक्यातील गावे असा वर्ग अशी रचना असायला हवी आणि लेखाला वर्ग जोडताना सर्वांत खालचा वर्ग जोडला जावा
अचूक.
यात काही अपवाद करावे - तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या गावा/शहराला जिल्ह्यातील शहरांचा सुद्धा वर्ग घालावा. जिल्ह्याच्या प्रशासकीय केन्द्राला राज्यातील शहरांचा सुद्धा वर्ग द्यावा, इ.
याशिवाय मोठ्या/महत्वाच्या शहरांना वरील स्तराचा वर्ग द्यावा. याला काटेकोर नियम लावला नाहीतरी साधारण ठोकताळ्याने हे वर्गीकरण करावे.
हे काम हाती घेतल्याबद्दल धन्यवाद!
अभय नातू (चर्चा) ०८:३६, ६ ऑगस्ट २०२० (IST)Reply
"हडकणी" पानाकडे परत चला.