सुंग आणि सोंग ही एकाच नामाची दोन रुपे आहेत. सोंग हे पिन्यिन उच्चारपद्धतीप्रमाणे आहे तर सुंग हे सामान्यीकरण असे कायसे तरी असलेल्या उच्चारपद्धतीचे रूप आहे. वर ह्या लेखाला जो इंग्लिशचा आंतरविकी दुवा दिलेला आहे तो सोंग घराण्याकडे पुनर्निर्देशीत होतो. आणि मराठी विकिपीडियावर सोंग घराण्यासाठी सोंग राजवंश नावाने आधीच एक लेख अस्तित्वात आहे. ह्यावर तुमचे काय मत?
अनिरुद्ध परांजपे १३:०८, २२ जून २०११ (UTC)
बरोबर. चिनी उच्चार मराठी देवनागरीत त्यातल्या त्यात अचूक लिहायचा झाल्यास सु-ओंग (काहीसा स्वोंग या लेखनाच्या मराठी वळणाने केलेल्या उच्चराजवल जाणारा) असा लिहिता येईल. त्यामुळे मराठी देवनागरीच्या गृहित लेखनसंकेतांनुसार सोंग राजवंश हा लेख मुख्य पान म्हणून ठेवणे इष्ट. सुंग राजवंश या पानावरून तिकडे पुनर्निर्देशन ठेवले तर बरे राहील.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १३:१८, २२ जून २०११ (UTC)

चिनी शब्दांचे उच्चार संपादन

चिनी भाषांतील शब्दांचे उच्चार रोमन लिपीत लिहून दाखवण्यासाठी ‘वेड जाइल्ज़’ ही पद्धत वापरात होती. (Sir Thomas Wade--1818-1895, केंब्रिज विश्वविद्यालयातील चिनीभाषा-पंडित आणि त्यांचे उत्तराधिकारी Herbert Allen Giles--1845-1935). ही पद्धत वेडसाहेबांनी त्यांच्या १८५९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या Peking Syllabary नावाच्या पुस्तकाद्वारे पहिल्यांदा प्रकाशात आणली. पुढे जाइल्ज़नी त्यांत काही सुधारणा केल्या. त्यानंतर अनेक वर्षे चिनी भाषांतील शब्दांची रोमन लिपीतील स्पेलिंगे याच वेड-जाइल्ज़ पद्धतीने होत होती. पुढे १९७९ मध्ये(की १९५८ मध्ये?) चीनने पिनयिन नावाची पद्धत अनुसरायला सुरुवात केली.

दोन पद्धतीतील प्रमुख फरक असे:

Wade-Giles--->Pinyin

  • p----------------> b
  • d----------------> t
  • ts----------------> c or z
  • ch----------------> ch
  • k----------------> g
  • chi----------------> ji
  • Chou---------------->Zhou वगैरे वगैरे.

त्यामुळे, Peking चे स्पेलिंग Beijing आणि Mao Tse Tung चे Mao Zedong झाले. तरीसुद्धा माझ्या मते, शब्दांच्या उच्चारांत काहीही फरक झाला नाही. Beijingचा उच्चार BBC वर अजूनही पीकिंग होतो. त्याच धर्तीवर, Sungचे स्पेलिंग Song झाले तरी उच्चार सुंगच राहिला असला पाहिजे....J १५:५८, २२ जून २०११ (UTC)

जे, आपण चिन्यांकडून उच्चार वदवून घेतलात काय ?
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:२१, २२ जून २०११ (UTC)

उत्तर संपादन

याचे उत्तर छिंगच्या चर्चापानावर दिले आहे....J १७:३१, २२ जून २०११ (UTC)

त्याविषयीची टिप्पणीही त्याच पानावर वाचायला मिळेल. :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १८:००, २२ जून २०११ (UTC)
"सुंग राजवंश" पानाकडे परत चला.