इंग्रजीत ण नाही, त्यामुळे अँडी मरे असे लिहिले तर त्या शब्दाचा उच्चार ऍण्डी मरे असा चुकीचा होईल. म्हणून हा शब्द ऍन्डी(अ वर चंद्र आणि न ला ड) मरे असाच लिहायला पाहिजे. जसे पँट चूक, पॅन्ट हवे, तसेच. असे आणखी शब्द इन्टरनेट, कॉन्टिनेन्टल वगैरे. मराठीत रूढ झालेल्या शब्दांसाठी हा नियम नाही. लंडन चालेल लन्डन लिहिण्याची गरज नाही.J १७:३०, १६ ऑगस्ट २००८ (UTC)

जे रूढ (पण चुकीचे शुद्धलेखन असलेले, उदा. इन्टरनेट) शब्द आहेत त्यांचे बरोबर शुद्धलेखन करणे ग्राह्य आहे? इंटरनेट लिहिले असता ते चूक धरले जाईल कि बरोबर?
अभय नातू १८:००, १६ ऑगस्ट २००८ (UTC)

पुनर्निर्देशन हवे-अन्ड्रु मरे या नावाचापण एक समान साहित्य असलेला लेख आहे.

V.narsikar १३:१२, १२ सप्टेंबर २००९ (UTC)

"अँडी मरे" पानाकडे परत चला.