चंडोल हा एक पक्षी आहे. त्याच्यात अनेक जाती आहेत. चिमणा चंडोल वगैरे. खूप सुंदर पक्षी आहे

युरेशियाई चंडोल (ॲलॉडा आर्वेन्सिस)

चिमणा चंडोल (ॲशी क्राऊन स्पॅरो लार्क) संपादन

 
चिमणा चंडोल

या पक्ष्यांचा रंग पाठीवर मातकट तपकिरी आणि छाती-पोटावर काळा असा असतो. हे पक्षी ओसाड जमीन, शेती व कोरड्या माळरानावर आढळतात. त्यांचा रंग माळावरच्या दगड-मातीशी कमालीचा एकरूप झालेला असतो. माळावर हिंडत असताना चिमण्या चंडोलांच्या हालचालींना वेग आलेला असतो. थव्यातला एखादा सभासद लाल तांबड्या मातीत धूळस्नान करत असतो. कुणी तुरूतुरू चालत गवतातले बी, किडे-कीटक टिपत असतो, तर कुणी दगडाच्या उंच सुळक्‍यावर बसून गोड सुरांची बरसात करत असतो.

चिमणा चंडोल हा पक्षी भारतात सर्वत्र आढळतो. हे पक्षी सुस्वर गातात व विलक्षण हवाई कसरती करतात. नर हा बाणासारखा हवेत झेप घेतो व पंख मिटून अतिशय वेगानं सूर मारत, गोड शीळ घालत खाली येतो. त्याचा तीरासारखा वेग पाहून एखाद्या नवख्या पक्षीनिरीक्षकाला वाटेल, की हा आता जमिनीवर आपटणार, पण तोच हा पंख पसरून पुन्हा हवेत झेप घेतो व शेवटी एखाद्या उंचवट्यावर उतरतो. गावाबाहेरच्या माळावर दिवसभर या चिमण्या चंडोलांच्या कंठातून बरसणाऱ्या गोड लकेरींनी चैतन्य पसरलेले असते. सूर्य अस्ताला गेल्यावर अंधारून आले, की त्यांचा थवा रात्रीची नीज घेण्यासाठी जमिनीवरच जागा शोधतो. हे पक्षी झाडा-झुडपांवर विश्रांती घेत नाहीत. यांचा विणीचा हंगाम अनियमित असून, पावसाळ्यापूर्वी मादी स्वतः मऊ पिसे व केस यांच्या साह्याने जमिनीवर उबदार घरटे बांधून दोन-तीन अंडी घालते. अंडी उबवणे व पिलांचे संगोपन करणे यासाठी मादीला नर मदत करतो.

मुरारी (रुफस टेल्ड लार्क) संपादन

 
मुरारी, लाल चंडोल, तांबूस शेपटीचा चंडोल

मुरारी व चिमणा चंडोल हे दोन्ही एकाच कुळातले पक्षी असून, त्यांच्या अनेक सवयींमध्ये साम्य आढळते. माळराने, शेती, नांगरलेली जमीन या प्रदेशांत आढळणारा मुरारी हा पक्षी चिमण्या चंडोलप्रमाणेच गवताच्या बिया, इतर धान्य व कीटक यांच्यावर गुजराण करतो. फेब्रुवारी ते मे या काळात मुरारीची मादी तीन-चार अंडी घालते.