घोडा हा एक चतुष्पाद प्राणी आहे.

घोडा

शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: खुरधारी
गण: अयुग्मखुरी
कुळ: हयाद्य
जातकुळी: इक्वस
लिन्नॉस, १७५८
घोडा
घोडे शर्यतीसाठी वापरले जातात

ओळख संपादन

मानवाने घोडे माणसाळवून त्यांचा वाहन म्हणून प्राचीन काळापासून उपयोग केला आहे. घोड्यांच्या जगभरात अनेक प्रजाती आहेत. मंगोलियासारखे काही देश तर तिथल्या आजतागायत अस्तित्वात असलेल्या अश्व-संस्कृतीसाठीच प्रसिद्ध आहेत. जगभरात आढळणाऱ्या घोड्यांच्या काही प्रमुख प्रजाती खालीलप्रमाणे... अरबी घोडा, ध्रुवीय घोडा, तट्टू, स्केंडिनेव्हियन घोडा, भारतीय घोडा, थरो ब्रेड घोडा, इंग्रजी घोडा, अमेरिकन घोडा, मंगोलियन घोडा, ओस्ट्रेलियन घोडा, इ.

भारतीय घोडा संपादन

भारतवर्षाला अश्वारोहणाचा प्रदीर्घ इतिहास आहे. भारतीय उपखंडाची व्याप्ती पूर्वी बऱ्याच दूरवर पसरलेली असल्याने,आज ज्या प्रजाती स्थानिक प्रदेशाच्या नावाने ओळखल्या जातात जसे की सिंधी घोडा, हे आजही मूळ भारतीय अश्व म्हणूनच ओळखले जातात. भारतीय अश्वांच्या काही प्रमुख प्रजाती खालीलप्रमाणे १) सिंधी घोडा २) मारवाडी घोडा ३) काठियावाडी\काठेवाडी घोडा ४) पंजाबी घोडा ५) भिमथडी तट्टू ६) पहाडी तट्टू ७) भारतीय सेना प्रजातीचा घोडा (ही इंग्रजांच्या काळापासून वेगळेपण जपलेली अशी एक संमिश्र अश्व प्रजाती असून या जातीचे घोडे, भारतीय सेना वगळता संपूर्ण जगात कोठेही आढळत नाहीत.)

 
सॅन मार्कोस राष्ट्रीय जत्रेत चेरेरियाचा कार्यक्रम

प्रकार संपादन

घोडे जास्तकरून शाकाहारी असतात. ते गवत खातात. घोडे ३० ते ४५ वर्षे जगतात. १९व्या शतकातील एक घोडा आजपर्यंत सगळ्यात जास्त ६५ वर्षे जगला.

घोडा ८ तासात १४०० कि मी अंतर पळू शकतो(???) पहा : प्राण्यांचे आवाज