ग्वादालकॅनाल मोहीम तथा ग्वादालकॅनालची लढाई किंवा ऑपरेशन वॉचटॉवर ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान ऑगस्ट ७, इ.स. १९४२ ते फेब्रुवारी ९, इ.स. १९४३ दरम्यान लढली गेलेली लढाई होती. ग्वादालकॅनाल बेट व आसपासच्या समुद्रात लढली गेलेली ही लढाई दोस्त राष्ट्रांनी दुसऱ्या महायुद्धात जपानविरुद्ध चढविलेले पहिले मोठे आक्रमण होते.