गुंड्याभाऊ ही मराठी लेखक चिं.वि. जोशी यांनी निर्माण केलेली काल्पनिक व्यक्तिरेखा आहे. हे गुंड्याभाऊ चिमणरावांचे मावसभाऊ आहेत. या अजरामर जोडगोळीवर १९४० च्या सुमारास ‘लग्न पहावे करून’,‘सरकारी पाहुणे’ वगैरे मराठी चित्रपट निघाले. चित्रपटांत चिमणरावांचे काम दामूअण्णा मालवणकर करीत व विष्णूपंत जोग गुंड्याभाऊचे काम करीत. पुढे १९७८ साली मुंबई दूरदर्शनवर त्याच कथानकांवर चिमणराव-गुंड्याभाऊ ही मालिका निघाली. या मालिकेत चिमणरावांचे काम दिलीप प्रभावळकर यांनी व गूंड्याभाऊचे काम बाळ कर्वे यांनी केले होते.

विष्णूपंत जोग (जन्म : १८ सप्टेंबर, १९०५) यांचे ‘मी गुंड्याभाऊ (विष्णूपंत जोग)’ नावाचे आत्मचरित्र आहे. ते मंदा खांडगे यांनी शब्दबद्ध केले आहे.

चिमणराव गुंड्याभाऊ दूरचित्रवाणी मालिकेचे कथानुक्रम :

१. बोळवण

२. गुंड्याभाऊचे प्राणांतिक उपोषण

३. लेफ्टनंटची लटपट

४. गुंड्याभाऊचे मोटार उड्डाण

५. अस्थानी पराक्रम

६. गुंड्याभाऊ तिकिट कलेक्टर

७. गुंड्याभाऊचे दुखणे

८. गुंड्याभाऊची दुकानदारी