गंगाधर रामचंद्र मोगरे

(गंगादर रामचंद्र मोगरे या पानावरून पुनर्निर्देशित)

गंगाधर रामचंद्र मोगरे (जन्म : शिरगाव - ठाणे जिल्हा) २१ जानेवारी १८५७; - मुंबई ११ जानेवारी १९१५) हे मराठीतील एक कवी होते. मराठीतील उपहासकाव्याचे जनक. यांची बहुतांश रचना दीर्घ स्वरूपाची, श्लोकबद्ध व आर्यावृत्तात आहे. विलापकाव्ये, उपहासकाव्ये, कथाकाव्ये व स्फुटकाव्ये असे यांच्या काव्यरचनेचे स्वरूप आहे. त्यांच्या अनेक कविता व्यक्तिचित्रांवर आधारित आहेत. इंग्रजी विलापकाव्यावरून स्फूर्ती घेऊन मोगरे यांनी विष्णूशास्त्री पंडित, विष्णूशास्त्री चिपळूणकर, आनंदीबाई जोशी, भाऊराव कोल्हटकर, व्हिक्टोरिया राणी, दयानंद सरस्वती, तुकोजीराव होळकर, जियाजीराव शिंदे, सनदी अधिकारी रिपन व सर जेम्स फर्गसन अशा अनेक सुप्रसिद्ध महान व्यक्तींवर विलापिका लिहिल्या आहेत. [१]

गंगाधर मोगरे यांचे प्राथमिक शिक्षण शिरगावात व मॅट्रिकपर्यंतचे मुंबईत झाले. त्यानंतर त्यांनी बँकेत नोकरी केली. १९८६साली त्यांची मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयात कारकून म्हणून नेमणूक झाली. ग्रंथालयातील नोकरीमुळे मोगरे यांचा काव्याचा व अन्य वाङ्‌मयाचा अभ्यास होऊन त्यांच्यातील काव्यशक्तीला चालना मिळाली. अव्वल इंग्रजी राजवटीतील ख्यातनाम कवी म्हणून मोगरे यांचे नाव घेतले जाते.

गंगाधर रामचंद्र मोगरे यांच्या कविता ’इंदुप्रकाश’, ’विविधज्ञानविस्तार’, ’मासिक मनोरंजन’ या मासिकांतून प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या ’मोगऱ्याची फुले’ या काव्यसंग्रहाचे शेवटचे तीन भाग त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले.

मोगरे यांची प्रकाशित विलापकाव्य-पुस्तके संपादन

  • महाराष्ट्र जनविलाप (इ.स.१८८४)
  • मोगऱ्याची फुले भाग १ला (इ.स.१९०२), भाग २रा (१९०४), भाग ३रा (१९१७), भाग ४था (१९१९) आणि भाग ५वा (१९२०)

मोगरे यांची उपहासोक्तिपूर्ण दीर्घकाव्ये संपादन

  • अभिनव धर्मस्थापना
  • पदवीचा पाडवा
  • मेथाजीची मजलस

मोगरे यांची रूपांतरित कथाकाव्ये संपादन

  • अभिनव कादंबरी (मूळ : धुंडीराजकवीचे संस्कृत काव्य)
  • आर्यप्रदीप (मूळ : कवी सर एडविन ॲर्नाल्ड याचे ’दि लाइट ऑफ एशिया’)
  • वाग्युद्ध (मूळ : ग्रीक कवी होमरचे ’इलियड’ हे महाकाव्य)

अन्य काव्ये संपादन

  • विजयिनी-विजयाष्टक (व्हिक्टोरिया राणीच्या हीरक जयंतीनिमित्त रचलेले प्रासंगिक काव्य)
  • सह्याद्री (मोगरे यांच्या देशाभिमानी वृत्तीचे दर्शन घडवणारे काव्य)

मोगरे यांची अपूर्ण राहिलेली कथाकाव्ये संपादन

  • आर्यभूपर्यटन (त्यातला हिंदुस्थानवर सिकंदराची स्वारी एवढाच भाग लिहून झाला)
  • जगद्‌देव चरित्र (स्वतंत्र)
  • वृंदा (स्वतंत्र)

संदर्भ संपादन

  1. ^ "मराठी साहित्याच्या पाउलखुणा--भाग १". Archived from the original on 2012-01-11. 2013-06-01 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)