खारकच्छ[श १], किंवा खाजण[१], म्हणजे समुद्रकिनारा व त्यापासून थोड्या अंतरावर वाळूचे संचयन होऊन निर्माण झालेले वाळूचे दांडे किंवा बांध या दोहोंमधील खाऱ्या पाण्याची पट्टी अथवा सरोवर होय [२].

तुर्कमेनिस्तानाच्या कास्पियन समुद्रालगतच्या किनाऱ्यावरील "काराबोगाझ गोल" नावाच्या खारकच्छाचे विहंगम दृश्य

वाळू, खडे, गाळ यांनी बनलेल्या जमिनीच्या अरुंद बांधामुळे आखाताचे किंवा उपसागराचे मुख बह्वंशी किंवा पूर्णपणे बंद झाले असल्यास जमिनीची पट्टी व मुख्य किनारा यांच्यामधील जलसाठ्यासही खारकच्छ म्हणून उल्लेखले जाते. काहीवेळा किनाऱ्यापासून काही अंतरावर उभ्या राहिलेल्या प्रवाळभित्तींमुळेही खारकच्छे बनतात [२]. खारकच्छला लगून (इंग्रजी), अनूप (संस्कृत), पश्चजल, समुद्रताल, कयाल (मल्याळम) आदि अन्य शब्द आहेत.

पारिभाषिक शब्दसूची संपादन

  1. ^ खारकच्छ (इंग्लिश: Lagoon, लगून). अन्य नावे : खाजण, कायल

संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ कुलकर्णी, एल.के. भूगोलकोश.
  2. ^ a b कुमठेकर,ज.ब. खारकच्छ (मराठी विश्वकोशातील नोंद). १८ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत