क्रिस (मराठी लेखनभेद: करिस ; भासा इंडोनेशिया, भासा मलेशिया: Keris / Kris ) हे इंडोनेशिया, मलेशिया, ब्रुनेई, दक्षिण थायलंड या भूप्रदेशांत ऐतिहासिक काळापासून प्रचलित असलेले एक पात्याचे शस्त्र आहे. यास नागमोडी वळणाच्या धारदार कडा असलेले पाते असते. या नागमोडी वळणांना किंवा लाटांना स्थानिक परिभाषेत लुक अशी संज्ञा आहे. सहसा क्रिसाच्या पात्यास विषम संख्येत लुक असतात व त्यांची संख्या तिनापासून तेरापर्यंत असू शकते. हे शस्त्र पंजात पकडण्यासाठी पात्यास मूठ जोडलेली असते. शस्त्र पंजात पकडून लक्ष्यास भोसकण्यासाठी उपयुक्त अशी या शस्त्राची संरचना असते.

योग्यकर्त्यातील एक क्रिस