कोलाहल (कोलाहलशास्त्र) ही गणिताची एक शाखा आहे. या शाखेचा उपयोग हवामानशास्त्र, समाजशास्त्र, भौतिकशास्त्र, यंत्रशास्त्र, अर्थशास्त्र, जीवशास्त्र आणि खगोलशास्त्र अशा विज्ञानातील अनेकविध शाखांमधे होतो. कोलाहलशास्त्र अशा प्रेरकचलित संहतिंचा अभ्यास करते ज्या त्यांच्या प्रारंभीच्या स्थितीला अतिसंवेदनशील असतात. या परिणामाला लोकप्रिय भाषेत फुलपाखरू परिणाम असे देखील म्हटले जाते. प्रारंभीच्या स्थितींमधील सूक्ष्म फरक (उदा. काही दशांशस्थळे सोडून दिल्याने आलेले फरक) अशा संहतिंमधे वाढत जातात आणि यामुळे अशा संहंतिंच्या वर्तनाचे तंतोतंत भाकित करणे अशक्य असते. त्यामुळेच अशा संहंतिंना 'कोलाहलित' संहंति असे म्हटले जाते. या परिणामात कोणत्याही अनिश्चित घटकाचा सहभाग नसतो आणि काळाप्रमाणे या संहतिंचा होणारा विकास हा संपूर्णपणे निश्चित नियमांनुसार होतो. प्रारंभीच्या स्थितिमधे केलेला अगदी सूक्ष्म फरक देखील काळामधे मोठा होत असल्याने हा परिणाम घडतो.[ संदर्भ हवा ]

लोरेन्झ आकर्षक