के.सी. रनरेमसंगी (मार्च १, इ.स. १९६३:मिझोरम, भारत - ) ही भारतीय लोकसंगीत गायिका आहे. मिझोरामच्या लोकसंगीतातील योगदानासाठी २०१७ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.[१] तिला भारत सरकारकडून २०२३ चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे.[२]

के.सी. रनरेमसंगी
आयुष्य
जन्म १ मार्च १९६३
जन्म स्थान कीतुम , सरछिप , मिझोरम, भारत
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव मिझोरम
देश भारत
भाषा मिझो भाषा
संगीत साधना
गायन प्रकार लोकसंगीत
गौरव
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार

ओळख संपादन

के.सी चा जन्म मिझोरम मधील सरछिप जिल्ह्यातील कीतुम गावात झाला. मिझोरामच्या लोकसंगीताचे प्राथमिक प्रशिक्षण तिने तिच्या वडिलांकडून घेतले. तिने संगीत और ललित कला संस्थान (IMFA) मिझोराम एल मंगलियाना येथे प्रवेश घेतला.[३]

कारकीर्द संपादन

के.सी. यांनी मिझोराम आणि देशातील इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मिझो भाषा तील लोकगीते सादर केली आहेत. तिने अनेक वर्षे प्रतिष्ठित मिझो महोत्सव, चापचर कुट मध्ये सादरीकरण केले आहे. [४] आणि मिझोराम राज्यांमध्ये लोकसंगीत गाण्याच्या माध्यमातून योगदान दिलेलं आहे जसे की अन् चुआई झो ता पथियान मिन मंगाना, ख्रिसमस लेंगखॉम हिया, मिझो लोकगीते संग्रह, ख्रिसमस गाणी, हृष्णियांग नान आंग ए ताई, रियाक्माव वलेंग रामथर झाई आणि लेंटाई नी ए तवी.[५] इ.स. १९९२ पासून नियमितपणे मिझो नृत्य आणि लोकसंगीताचे वर्ग घेत आहेत; पारंपारिक ज्ञानाचा प्रसार आणि तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.[६]

पुरस्कार संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ a b "President presents 2017 Sangeet Natak Akademi Awards to 42". Business-Standard.com (English भाषेत). 6 February 2019. Archived from the original on 1 February 2023. 1 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ a b "Padma Awards 2023: Full list of 106 recipients named for civilian honours". हिंदुस्तान टाइम्स (English भाषेत). 26 January 2023. Archived from the original on 1 February 2023. 1 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "KC RUNREMSANGI Akademi Award: Folk Music, Mizoram" (PDF). sangeetnatak.gov.in (English भाषेत). 1 February 2023. Archived (PDF) from the original on 1 February 2023. 1 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "Hope other artistes working to promote indigenous art get inspired: Padma Shri awardee from Mizoram". theprint.in (English भाषेत). 29 January 2023. Archived from the original on 1 February 2023. 1 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "KC Runremsangi". zaideih.com (English भाषेत). 1 February 2023. Archived from the original on 1 February 2023. 1 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "Middle School zirlaiten Chheihlam intihsiak an nei". mizoculture.mizoram.gov.in (English भाषेत). 23 November 2023. Archived from the original on 1 February 2023. 1 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)