कॅरम हा जगातील (विशेषतः भारतातील) एक लोकप्रिय बैठा खेळ आहे. ह्या खेळात एकावेळी कमाल ४ खेळाडू भाग घेऊ शकतात. कॅरम बोर्ड हा लाकडापासुन बनवलेला चौरसाकृती पृष्ठभाग असतो, ज्याच्या ४ कोनाड्यांजवळ मोठी गोल छिद्रे असतात. स्ट्रायकर नावाची जड सोंगटी वापरून इतर हलक्या गोल सोंगट्या ह्या गोल छिद्रांमध्ये ढकलणे हे ह्या खेळाचे उद्दिष्ट आहे.

सामान्यपणे वापरला जाणारा कॅरम बोर्ड
कॅरममधील सोंगट्या

कॅरम खेळात ९ पांढऱ्या, ९ काळ्या व १ गुलाबी (राणी वा क्वीन) अशा १९ सोंगट्या असतात. ह्या सोंगट्या व स्ट्रायकरचे कॅरम बोर्डवर होणारे घर्षण कमी करण्याकरिता पातळ बोरिक पावडर वापरली जाते.

कॅरम हा खेळ भारतात खूप खेळला जातो.भारतातल्या मुख्य म्हणजे महाराष्ट्र,तमिळनाडू,मध्यप्रदेशमध्ये खेळला जातो.ह्या खेळासाठी ऑल इंडिया कॅंरम फेडरेशन ही संस्था भारतात कार्यरत आहे.ह्या संस्थेची स्थापना १९व्या शतकात झाली.ह्या संस्थेचे सध्याचे अध्यक्ष सरबजीत सिंघ आहेत.ही संस्था आय.सी.एफ म्हणजे आंतरराष्ट्रीय कॅंरम फेडरेशनशी निगडीत आहे. 

क्वीन ही मौल्यवान असते. केरम बोर्डचे सेटअप करताना क्वीन मध्ये असते. याचे वजन १५ ग्राम असते. छिद्रात स्ट्राइकर गेला तर फॉउल ठरतो.

खेळाचे प्रकार संपादन

१) काळ्या-पांढऱ्या:- संपादन

 जगभरात जो प्रकार खेळला जातो तो म्हणजे हा होय काळ्या-पांढऱ्या. हा प्रकार खेळण्यासाठी अनेक अॅप्स देखील आहेत. एका पक्षाच्या काळ्या सोंगट्या तर विरुद्ध पक्षाच्या पांढऱ्या सोंगट्या असतात. क्वीन सर्वात शेवटी सेट करतात.

२) गुण क्रीडा:- संपादन

 या प्रकारात फक्त सोंगट्या छिद्रात पाठवायच्या असतात. काळ्या सोंगटी करिता १ गुण, पांढऱ्या सोंगटी करिता २ गुण आणि गुलाबी (क्वीन) सोंगटी करिता ५ गुण मिळतात. ज्याचे गुण अधिक तो विजयी ठरतो.

३) व्यापार:- संपादन

 कॅरमच्या या प्रकारात विविध भाग खरेदी केले जातात आणि त्या भागात सोंगटी गेल्यावर ती सोंगटी त्या खेळाडूस मिळते ज्याने तो भाग खरेदी केला आहे मग ती सोंगटी त्या भागात कोणत्याही खेळाडूकडून गेली असेल तरीही.

४) भिकारी:- संपादन

 हा खेळ तोपर्यंत खेळला जातो जोपर्यंत विरुद्ध पक्षातील खेळाडूंकडे एकही सोंगटी शिल्लक राहत नाही.

खेळाचे नियम व अटी संपादन

१) जर छिद्रात फक्त स्ट्राइकरच गेला तर दंड म्हणून एक सोंगटी खेळात भरावी लागते व त्या खेळाडूची संधी जाऊन विरुद्ध पक्षातील खेळाडूस संधी मिळते.

२) जर छिद्रात स्ट्राइकरसोबत सोंगटीही गेली तर ती सोंगटी खेळात पुन्हा भरावी लागते व त्या खेळाडूची संधी जाऊन विरुद्ध पक्षातील खेळाडूस संधी मिळते.

३) जर छिद्रात स्ट्राइकरसोबत क्वीन (गुलाबी सोंगटी) गेली तर दंड म्हणून एक सोंगटी खेळात भरावी लागते व त्या खेळाडूस पुन्हा एकदा संधी मिळते.

वरील तीन नियम मुख्य नियम असुन सर्व प्रकारात समान असतात. या व्यतिरिक्त आणखी काही नियम आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारच्या खेळासाठी वेगवेगळे आहेत.