कुंकुमार्चन हा हिंदू धर्मातील एक पूजाप्रकार आहे. देवीच्या उपासनेत या विधीचे विशेष महत्व आहे.[१]

कुंकुमार्चन पूजा

स्वरूप संपादन

देवीच्या मूर्तीवर कुंकवाचा अभिषेक करीत राहणे आणि त्यावली देवीची स्तोत्रे किंवा मंत्र म्हणणे असे या विधीचे स्वरूप असते. श्रावण महिन्यात किंवा शारदीय नवरात्र उत्सवात हा विधी करण्याची पद्धती दिसून येते.[१]

कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरात सार्वजनिक स्वरूपात कुंकुमार्चन विधीचे आयोजन केले जाते. महिला या विधीमध्ये सहभाग घेतात आणि देवीची उपासना करतात.[२] विविध सार्वजनिक देवी मंदिर विशेष पूजेचे आयोजन करतात आणि तिथे कुंकुमार्चन विधी संपन्न केला जातो.[३]

संदर्भ संपादन

  1. ^ a b author/online-lokmat (2022-07-29). "Shravan Shukravar Vrat 2022: श्रावणातल्या शुक्रवारी 'असे' करा देवीचे कुंकुमार्चन; वाचा सविस्तर विधी!". Lokmat. 2022-10-01 रोजी पाहिले.
  2. ^ टीम, एबीपी माझा वेब (2022-07-29). "Kunkumarchan ceremony at Ambabai temple : अंबाबाई मंदिरात 'कुंकुमार्चन' सोहळ्याचे आयोजन". marathi.abplive.com. 2022-10-01 रोजी पाहिले.
  3. ^ "लेसर शोच्या झगमगाटात मिरवणूकीने दुर्गामूर्तीचे आगमन". Tarun Bharat (इंग्रजी भाषेत). 2022-10-01 रोजी पाहिले.