काबूस बिन सैद अल सैद

ओमान देशाचा सुलतान

काबूस बिन सैद अल सैद (अरबी: قابوس بن سعيد آل سعيد Qābūs bin Saʿīd ʾĀl Saʿīd)(१८ नोव्हेंबर १९४० - १० जानेवारी २०२०[१]) हा मध्य पूर्वेतील ओमान देशाचा सुलतान आहे. तो अल सैद घराण्याचा १४व्या पिढीमधील वंशज आहे.

काबूस बिन सैद अल

ओमानचा सुलतान
कार्यकाळ
२३ जुलै १९७० – १० जानेवारी २०२०
मागील सैद बिन तैमुर

जन्म १८ नोव्हेंबर, १९४० (1940-11-18) (वय: ८३)
सलालाह, ओमान
मृत्यू १० जानेवारी, २०२० (वय अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "{")
धर्म इस्लाम

ओमानमधील सलालाह येथे जन्मलेल्या काबूसने भारतातील पुणे येथे प्राथमिक शिक्षण घेतले. वयाच्या विसाव्या वर्षी इंग्लंडच्या लष्करी महाविद्यालयातून उत्तीर्ण झाल्यानंतर काबूसने १ वर्ष ब्रिटिश लष्करात नोकरी केली. वयाच्या तिसाव्या वर्षी त्याने ओमानच्या शाही राजवाड्यात घडलेल्या एका बंडात वडील सैद बिन तैमुर ह्यांना सुलतानशाहीवरून हुसकावून लावले व स्वतः सुलतान बनला.

काबूसच्या राजवटीत ओमानमध्ये संपूर्ण एकाधिकारशाही आहे. त्याने घेतलेले राजकीय निर्णय कोणीही परतवू शकत नाही. परंतु काबूसने हळूहळू ओमानमध्ये निवडणुका घेण्यास संमती दिली आहे. बरेचदा तो देशामधील अनेक भागांना भेट देतो व त्याच्या सफरींमध्ये सामान्य नागरिक त्याला भेटून आपल्या अडचणी सांगू शकतात. काबूसची ४० वर्षांची राजवट ओमानसाठी विकसनशील ठरली आहे. मध्य पूर्वेमधील इतर देशांच्या तुलनेत ओमानमध्ये कायदा व सुव्यवस्था तसेच स्थैर्य व समृद्धी लाभली आहे. ओमानने वाहतूक सेवा, शिक्षण, आरोग्य सेवा इत्यादी सामाजिक बाबींवर प्रचंड खर्च केला आहे तसेच आपले परराष्ट्रीय संबंध सुधारले आहेत. काबूसने तटस्थ परंतु सलोख्याचे आंतरराष्ट्रीय धोरण राखले आहे. त्याला १९९८ साली आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार बहाल करण्यात आला.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "Oman's Sultan Qaboos dies: state media". Al Jazeera. 11 January 2020. 10 January 2020 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन