मल्लेश्वरी

(कर्णम मल्लेश्वरी या पानावरून पुनर्निर्देशित)

कर्णम मल्लेश्वरी (जन्म : श्रीकाकुलम, १ जून १९७५) ही एक निवृत्त भारतीय वेटलिफ्टर आहे. 2000 मध्ये ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे.[१] 1994 मध्ये तिला अर्जुन पुरस्कार आणि 1999 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान मिळाला. तिला पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे.[२]

ऑलिंपिक पदक माहिती
महिला वेटलिफ्टिंग
कांस्य २००० सिडनी ६९ kg
के मल्लेश्वरी

सुरुवात संपादन

१९९०मध्ये बंगलोर येथील खेळाडूंच्या कॅंपमध्ये मल्लेश्वरीला राष्ट्रीय अर्जुन पुरस्कार विजेत्या श्यामलाल सलवान यांनी हेरले आणि भारोत्तालन स्पर्धेसाठी उद्युक्त केले. तेव्हापासून मल्लेश्वरीला या खेळात रस निर्माण झाला आणि तिने त्यासाठी मेहनत करायला सुरुवात केली' वर्षभरातच भारोत्तालन करणाऱ्या खेळाडूंच्या भारतीय चमूसाठी तिचे नाव चर्चेमध्ये आले. जेव्हा २००० च्या ऑलिम्पिकसाठी नावे सुचवण्यात आली तेव्हा कुंजुराणीला डावलून मल्लेश्वरीची निवड झाली. त्यावेळी मोठा हल्लाबोल झाला. मल्लेश्वरीवरती खर्च करणे म्हणजे तिला सरकारी खर्चाने पर्यटनासाठी पाठवणे आहे, अशी टीका झाली. पण कांस्य पदक मिळवून मल्लेश्वरीने आपली निवड उचित ठरवली.

कारकीर्द संपादन

मल्लेश्वरीच्या करियरची सुरुवात ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेपासून केली. १९९२ साली मल्लेश्वरीने आशियाई स्पर्धेत ३ रौप्य पदके जिंकली. त्यानंतर ऑलिंपिक स्पर्धेत ३ कांस्य पदके जिंकली. पण तिचे खरे यश तिने सिडनी येथे डिसेंबर २०००मध्ये मिळवलेल्या कांस्य पदकात आहे. तिने स्नॅच प्रकारात ११० किलो वर्गात आणि क्लीन ॲन्ड जर्क प्रकारात १३० किलो वजन उचलले. अशा प्रकारे एकूण २४० किलो वजन उचलल्यामुळे मल्लेश्वरी भारतासाठी भारोत्तलन स्पर्धेत कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला ठरली.

मल्लेश्वरीची आधीची कामगिरी संपादन

  • १९९८ मध्ये आशियाई खेळांमध्ये भारोत्तालनच्या ६३ किलो वर्गात रौप्य पदक जिंकले.
  • १९९७ मध्ये आशियाई गेम्समध्ये ५४ किलो वर्गात रौप्य पदक जिंकले.
  • १९९६ च्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत जपानमध्ये सुवर्णपदक जिंकले.
  • १९९५ च्या विश्वचषक स्पर्धेत चीनमध्ये सुवर्णपदक जिंकले.


संदर्भ संपादन

  1. ^ "telegraph".
  2. ^ "padma" (PDF). Archived from the original (PDF) on 2015-10-15. 2022-01-11 रोजी पाहिले.