कमळपक्षी कुळातील दोन जाती आपल्याकडे सापडतात. Bronze-Winged Jacana (Metopidius indicus) कांस्यपक्षी कमळपक्षी आणि Pheasant- Tailed Jacana (Hydrophasianus chirugrusus). कमळपक्षी हा दलदलीत, तलावात आणि कमळवेलींच्या तळ्यात आढळणारा साधारण ३१ सें. मी. आकाराचा पक्षी आहे.

कमळपक्षी,पियू
शास्त्रीय नाव
(Hydrophasianus chirurgus)
कुळ जकानाद्य
(Jacanidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश
(Pheasant-tailed Jacana)
संस्कृत जलमंजोर
हिंदी जलकपोत, पिहो

वर्णन संपादन

हा पाणथळ पक्षी बराचसा पाणकोंबडीच्या वळणाचा आहे. टंगाळे पाय, कोळ्यांच्या पायांसारखी लांबसडक बोटे आणि लांब, सरळ नखं असलेला हा एक पाणपक्षी. वीणीच्या हंगामात नर पियूला कोयत्याच्या आकाराची लांब आणि टोकदार शेपटी असते. त्यावेळी त्याचा रुबाब वाढतो. वीण काळानंतर ही शेपटी झडून पडते. एरवी नर-मादी दिसायला सारखेच असतात. छातीच्या वरील भागात काळा पट्टा, गळ्याचा भाग पांढरा, चोच व मानेचा भाग पिवळा, डोळ्याजवळून एक उभी, लांब काळी रेघ, उर्वरीत पाठ, पोट इ. तपकिरी रंगाचे. या पक्ष्याचे पाय, पायांची बोटे व नखे मोट्ठी असतात, जेणेकरून यांना तरंगत्या पाण वनस्पतीवर किंवा तरंगत्या पानांवर चालता येते. वीण काळात नराला शेपटी असते तर त्याचा तपकिरी रंग जास्त गडद होतो.

आढळस्थान संपादन

कमळपक्षी एकट्याने किंवा थव्याने तलावात, कमळवेलींच्या आसापास दिवसभर पोहतांना दिसतात. हा पक्षी हिमालयाच्या २००० मी. उंचीपर्यंत भारतभर सर्वत्र आढळ्तो तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार हा देशातही याची वस्ती आहे. आपल्या जातिवंत सौंदर्याने जलाशयाची शोभा वाढवणारे हे रूपवान पक्षी निसर्गाची शान आहेत. म्हणूनच थायलंड सरकारच्या टपाल विभागातर्फे या दोन्ही कमळ पक्ष्यावर आकर्षक तिकिटे प्रकाशित केली आहेत.

खाद्य संपादन

पाणथळीतील पाणवनस्पती, पाण कीटक, लहान मासे, मृदु शरीरी कालव, शंख व शिंपल्या, गोगलगायी, पाण वनस्प्तींच्या बिया, त्यांचे कोंब हे कमळपक्ष्याचे आवडते खाद्य आहे.

घरटे संपादन

दोन्ही जातीतील मादीचे अनेक सहचर असतात. कमळपक्षी शिंगाड्याच्या किंवा कमळाच्या पानावर आपले घरटे बांधतो. मादी एकावेळी ३ ते ४, चमकदार हिरवट-तपकिरी रंगाची अंडी देते. कमळपक्ष्याची मादी बहुपतिकत्व स्वभावाची असून पिलांचे संगोपन नर कमळपक्षी करतो.
एका नराबरोबर समागम करून ती अंडी घालून मोकळी होते. अंड्यांचे उबविणे व पिलांची निगा राखणे हे काम संपूर्णपणे नरावर सोपवून ती दुसऱ्या नराकडे जाते व अशा प्रकारे ती एका मागोमाग एक असे अनेक घरोबे करते. 

चित्रदालन संपादन