ओट (Avena sativa) हे युरोप व अमेरिका येथे वापरात असलेले एक एकदलिक धान्य आहे. याच्या पिकाला थंड, ओलसर हवा आणि मध्यम जमीन लागते. त्यामुळे ओटचे पीक भारतात हिमालयाच्या असलेल्या प्रदेशांत अल्प प्रमाणात घेतले जाते. ओटचे तुसे काढलेले दाणे भट्टीत भाजून त्याचे पीठ करतात व पिठाची बिस्किटे करतात.

ओटचे पोहे तयार करतात. ते शिजवून पाण्यात वा दुधात भिजवून सकाळी न्याहारी म्हणून खातात. ओटच्या पोह्यांची खीर बनते तसेच उत्तप्पाही करता येतो.

हे सुद्धा पहा संपादन