एम. अरुणाचलम

भारतीय राजकारणी

मुकय्या अरुणाचलम (मार्च ४, इ.स. १९४४-जानेवारी २१, इ.स. २००४) हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९७७, इ.स. १९८०, इ.स. १९८४, इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकींमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तर इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तामिळ मानिला काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तामिळनाडू राज्यातील तेनकासी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते इ.स. १९९६ ते इ.स. १९९८ या काळात देवेगौडा आणि गुजराल सरकारमध्ये कामगारमंत्री आणि रसायने आणि खते मंत्री होते. इ.स. २००१ मध्ये तमिळ मानिला काँग्रेसचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण झाल्यानंतर ते परत काँग्रेस पक्षात सामील झाले.