एमी ॲडम्स

अमेरिकन अभिनेत्री

एमी लू ॲडम्स (इंग्लिश: Amy Lou Adams; २० ऑगस्ट १९७४) ही एक अमेरिकन सिने अभिनेत्री व गायिका आहे. हॉलिवूडमधील आघाडीच्या व सर्वाधिक मानधन मिळवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणाऱ्या ॲडम्सला २०१४ सालच्या एका सर्वेक्षणामध्ये जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान मिळाले होते. १९९९ पासून हॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या ॲडम्सला आजवर २ गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले असून ५ वेळा ऑस्कर पुरस्कारासाठी तर ६ वेळा ब्रिटिश अकादमी फिल्म पुरस्कारासाठी नामांकने मिळाली आहेत.

एमी ॲडम्स
जन्म २० ऑगस्ट, १९७४ (1974-08-20) (वय: ४९)
विचेन्झा, व्हेनेतो, इटली
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र अभिनेत्री, गायिका
कारकीर्दीचा काळ १९९५ - चालू

२००२ सालच्या स्टीव्हन स्पीलबर्ग दिग्दर्शित कॅच मी इफ यू कॅन ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी ॲडम्स प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर ज्युनेबर्ग, एन्चान्टेड, द फाईटर, अमेरिकन हसल इत्यादी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका करून तिने आपले सिने उद्योगातील स्थान बळकट केले. अमेरिकन हसलमधील भूमिकेसाठी तिला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. २०१६ मधील अराईव्हल ह्या विज्ञानरंजित चित्रपटात देखील ॲडम्स आघाडीच्या भूमिकेत चमकली.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: