उत्तर २४ परगणा जिल्हा


उत्तर २४ परगणा जिल्हा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात स्थित असून त्याच्या पूर्वेला बांगलादेश तर दक्षिणेला बंगालचा उपसागर आहे. उत्तर २४ परगणा जिल्ह्याचा बराचसा भाग कोलकाता महानगराच्या हद्दीत येतो. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्याच जिल्ह्यात स्थित आहे.

उत्तर २४ परगणा जिल्हा
উত্তর চব্বিশ পরগণা জেলা
पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा
उत्तर २४ परगणा जिल्हा चे स्थान
उत्तर २४ परगणा जिल्हा चे स्थान
पश्चिम बंगाल मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
मुख्यालय बारासात
क्षेत्रफळ
 - एकूण ४,०९४ चौरस किमी (१,५८१ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १,००,८२,८५२ (२०११)
-लोकसंख्या घनता २,५०० प्रति चौरस किमी (६,५०० /चौ. मैल)
-साक्षरता दर ८४.५%
-लिंग गुणोत्तर ९४९ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ बनगाव, बराकपूर, दम दम, बारासात, बशीरहाट
संकेतस्थळ

उत्तर २४ परगणा जिल्ह्याची लोकसंख्या १ कोटी पेक्षा अधिक असून महाराष्ट्रामधील ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यामुळे सध्या उत्तर २४ परगणा हा भारतामधील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा बनला आहे.