इराणची इस्लामिक क्रांती (फारसी: انقلاب اسلامی) ही इराण देशामध्ये १९७८-७९ दरम्यान घडलेली एक महत्त्वपूर्ण घटना होती. इराणी जनतेने केलेल्या ह्या क्रांतीदरम्यान १९२५ सालापासून चालू असलेली पेहलवी घराणेशाही बरखास्त केली गेली व मोहम्मद रझा पेहलवी ह्या इराणच्या शेवटच्या शहाचे राजतंत्र संपुष्टात आले. ह्या राजतंत्राऐवजी इराणमध्ये इस्लामिक प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली.

तेहरानमधील निर्देशक

अमेरिकाब्रिटनच्या पाठिंब्यावर १९४१ सालापासून इराणच्या शहापदावर असलेल्या पेहलवी विरुद्ध ऑक्टोबर १९७७ साली बंडाला सुरू झाली. १९७८ साली ह्या चळवळीने देशव्यापी स्वरूप घेतले व अनेक संप व निदर्शनांमुळे इराणचे कामकाज व अर्थव्यवस्था ठप्प झाली. घाबरलेल्या पेहलवीने १६ जानेवारी १९७९ रोजी देशामधून पळ काढला. १९६३ पासून देशाबाहेर हकालपट्टी झालेल्या रुहोल्ला खोमेनीने १ फेब्रुवारी १९७९ रोजी पुन्हा इराणमध्ये प्रवेश केला. ११ फेब्रुवारी रोजी तेहरानमध्ये झालेल्या चकमकीत बंडखोरांनी विजय मिळवून शहाची सत्ता संपुर्णपणे संपुष्टात आणली. डिसेंबर १९७९ मध्ये रुहोल्ला खोमेनीची इस्लामिक अयातुल्ला (सर्वोच्च पुढारी) ह्या पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजय मिळवून अबोलहसन बनीसद्र इराणचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनला.

इराणी क्रांतीनंतर अमेरिका व इराणदरम्यान असलेले संबंध संपुष्टात आले. इराण-इराक युद्धाच्या कारणांपैकी इराणी क्रांती हे एक महत्त्वाचे कारण मानले जाते.

बाह्य दुवे संपादन