इटकी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे. सातारा, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या तसेच सांगोला, माळशिरस, आटपाडी आणि माण या चार तालुक्यांच्या सीमेवर हे छोटेसे गाव वसले आहे.

भौगोलिक स्थान संपादन

इतकी गाव तीनशे ते चारशे वर्षांपूर्वी वसले आहे. इतकी मध्ये जाणे आणि येण्यासाठी दिघंची -इतकी -बचेरी रस्ता तसेच मल्हारपेठ -पंढरपूर रस्ता ते राजेवाडी- म्हसवड रस्ता असे दोन रस्ते असून पूर्वी सांगोला इतकी एसटी बसची सोय होती परंतु प्रवासी नसल्यामुळे एसटी सेवा बंद करण्यात आलेली आहे या गावात यायचे असल्यास पायी चालत अथवा स्वतःचे वाहन असल्यास किंवा भाड्याने वाहन करून यावे लागते . येथे शेती हे प्रमुख उपजीविकेचे साधन आहे शेतीला जोड धंदा म्हणून येथील गावकरी दुग्ध व्यवसाय करतात शेतीमध्ये प्रामुख्याने ज्वारी बाजरी गहू मका कापूस भुईमूग तूर हरभरा ऊस इत्यादी पिके घेतली जातात दुग्ध व्यवसाय मध्ये जर्सी गाई म्हैस इत्यादींपासून दूध उत्पादन केले जाते शेळी पालन मेंढी पालन हे देखील केले जाते. गावामध्ये तीन किराणाचे दुकाने आहेत तसेच दोन छोट्या पानटपरी आहेत. याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही सोयीसुविधा साठी सात किलोमीटरवर असणाऱ्या गावांमध्ये जावे लागते. गाव दुर्गम भागात असून तीन जिल्ह्याच्या सरहद्दीवर तसेच चार तालुक्‍यांच्या सरहद्दीवर असल्यामुळे विकासापासून वंचित राहिले आहे स्थानिक लोकप्रतिनिधी शिक्षित नसल्यामुळे गावचा विकास खोळंबून राहिला आहे जे काही शिक्षित सुशिक्षित तरुण होते ते नोकरीनिमित्ताने व्यवसाय निमित्ताने गाव सोडून दुरच्या शहरात , सोयीच्या ठिकाणी स्थलांतरित झाले त्यामुळे गावामध्ये गावचा विकास होईल असं विशेष लक्ष देणार कोणी नसल्यामुळे गावचा विकास अडखळला आहे.

हवामान संपादन

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.

लोकजीवन संपादन

प्रेक्षणीय स्थळे संपादन

महादेव मंदिर: इटकी गावाच्या पूर्वेला तीन किलोमीटरवर शिंगोर्णी गावाच्या सरहद्दीला लागून एक उंच डोंगर आहे त्या डोंगरावरती पाचशे वर्षांपूर्वीचे श्री महादेवाचे जुने मंदिर आहे.

भवानी मातेचे मंदिर: महादेव डोंगराच्या पायथ्याशी पश्चिम दिशेला इतके गावांमध्ये जाणाऱ्या रस्त्याला लागून चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचे जुने भवानी मातेचे मंदिर आहे समोर दोन दीपमाळा आहेत तसेच बाजूला श्री हनुमानाचे छोटे मंदिर आहे वर्षातून दसऱ्याच्या दिवशी येथे यात्रा भरते भल्या पहाटे उठून ग्रामस्थ काकड आरतीला मंदिरा मध्ये हजर होतात तसेच मोठ्या भक्तिभावाने दिवसभर यात्रा चालते येथे सामुदायिक भोजनाचा कार्यक्रम होतो लोकवर्गणीतून पैसे जमा करून एक मोठे बोकड विकत घेतले जाते दसऱ्याच्या दिवशी देवीला त्याचा बळी दिला जातो आणि नंतर त्याचे कालवण करून सर्व लोक प्रसाद म्हणून भक्तिभावाने खातात.

श्री खंडोबा मंदिर: येथील गावाच्या पश्चिमेला राजेवाडी रस्त्याला पाझर तलावाच्या लगत तीनशे वर्षांपूर्वीचे श्री खंडोबाचे जुने मंदिर आहे , गेल्या दहा वर्षांमध्ये त्याचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार केला गेला वर्षातून सोमवती अमावस्याच्या वेळेला येथे यात्रा भरते, रात्रभर जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो.

श्री हनुमान मंदिर: गावामध्ये मध्यवर्ती ठिकाणी श्री हनुमानाचे खूप वर्षांपूर्वीचे जुने मंदिर आहे मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पाच वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून केले गेले आहे हनुमान मंदिराच्या समोर महादेवाचे मंदिर आहे दरवर्षी येथे वर्षातून एक वेळ भंडारा कार्यक्रम आयोजित केला जातो मोठ्या काहिली मध्ये गावकरी खीर बनवतात सर्व लोक प्रसाद म्हणून भक्तिभावाने खातात

नागरी सुविधा संपादन

गावामध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण व्यवस्था आहे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत इटकी विद्यालय इटकी ही माध्यमिक शाळा आहे. याच्या व्यतिरिक्त गावात एक ग्रामपंचायत कार्यालय आहे. गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप तसेच सार्वजनिक विहीर आहे. सार्वजनिक विहिरीतून नळाद्वारे गावांमध्ये पाणीपुरवठा होतो, इटकी गावाच्या गावठाण पेक्षा वस्ती वर राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. गावामध्ये दवाखाना नाही, पोस्ट ऑफिस तसेच बँक सुद्धा नाही.

जवळपासची गावे संपादन

दक्षिणेला सात किलोमीटर वरती दिघंची हे मोठे गाव असून येथे आठवडा बाजारासाठी तसेच इथे गावाच्या दळणवळणासाठी तसेच व्यवहारासाठी इटकी मध्ये राहणाऱ्या लोकांना दिघंची हे गाव सोयीचे पडते. उत्तर दिशेला सात किलोमीटर अंतरावर बचेरी हे माळशिरस तालुक्यातील गाव असून बचेरी पासून तीन किलोमीटर उत्तरेकडे पिलीव हे आठवडी बाजाराचे मोठे गाव आहे. इटकी पासून पूर्वेला 15 किलोमीटर अंतरावर कटफळ हे इटकीचे पोस्ट ऑफिस गाव आहे. इटकीपासून पश्चिमेला पाच किलोमीटरवर राजेवाडी हे गाव आहे, राजेवाडी मध्ये दीडशे वर्षांपूर्वीचा ब्रिटिश कालीन तलाव आहे. इटकी गावच्या पश्चिमेला तीन किलोमीटर अंतरावर श्री श्री श्री सद्गुरू सहकारी साखर कारखाना आहे.

संदर्भ संपादन

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate