आय.ए.यू.ची ग्रहाची व्याख्या

२००६ मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटना (आय.ए.यू.)ने ग्रहाची औपचारिक व्याख्या केली. त्यानुसार जर एखादी खगोलीय वस्तू खालील तीन अटी पूर्ण करत असेल तर त्याला ग्रह मानण्यात यावे.

  1. ती खगोलीय वस्तू सूर्याभोवती प्रदक्षिणा मारत असावी.
  2. त्या खगोलीय वस्तूचे वस्तुमान कमीत कमी इतके असावे की ज्यायोगे तिचा आकार गुरुत्वाकर्षणामुळे गोलाकार (spherical) व्हावा.
  3. त्या खगोलीय वस्तूने आपली कक्षेजवळील भाग साफ केलेला असावा. याचा अर्थ असा की तिच्या कक्षेजवळील अंतराळातील लहान वस्तू तिच्या गुरुत्वाकर्षणाने तिच्यामध्ये विलीन झाल्या असाव्यात.[१][२]

प्लूटो तिसरी अट पूर्ण करत नाही. त्याचे वस्तूमान त्याच्या कक्षेतील इतर वस्तूंच्या केवळ ०.०७ पट आहे. (पृथ्वीचे वस्तुमान पृथ्वीच्या कक्षेतील वस्तूंच्या १७ दशलक्ष पट आहे.)[३][४] आय.ए.यू.ने पुढे ठरविले की प्लूटोला बटु ग्रह या नवीन तयार केलेल्या वर्गात टाकले जावे तसेच तो नेपच्यूनपलीकडील वस्तू या वर्गातील प्लूटॉईड या उपवर्गाचा मूळ नमुना (prototype)सुद्धा मानण्यात यावा.

संदर्भ संपादन

  1. ^ "IAU 2006 General Assembly: Resolutions 5 and 6" (PDF). August 24, 2006.
  2. ^ "IAU 2006 General Assembly: Result of the IAU Resolution votes" (Press release). International Astronomical Union (News Release - IAU0603). 2006-08-24. 2008-06-15 रोजी पाहिले.
  3. ^ Steven Soter. "What is a Planet?". Department of Astrophysics, American Museum of Natural History. 2007-02-21 रोजी पाहिले.
  4. ^ "IAU 2006 General Assembly: Result of the IAU Resolution votes". August 24, 2006. Archived from the original on 2006-11-07. 2008-10-29 रोजी पाहिले.