आयएनएस निपात (के८६)
(आयएनएस निपात या पानावरून पुनर्निर्देशित)
आयएनएस निपात (के८६) ही भारतीय आरमाराची विद्युत वर्गीय प्रक्षेपास्त्र नौका होती. ही नौका २६ एप्रिल, १९७१ रोजी आरमारात दाखल झाली व २९ फेब्रुवारी, १९८८ रोजी हिला निवृत्त करण्यात आले.
A Vidyut class missile boat of the Indian Navy | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | जहाज | ||
---|---|---|---|
चालक कंपनी | |||
| |||
हा लेख भारतीय आरमाराची विद्युत वर्गीय प्रक्षेपास्त्र नौका याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, आयएनएस निपात (के४२).
ऑपरेशन ट्रायडेंट संपादन
१९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात निपातने मोठी भूमिका पार पाडली होती. ऑपरेशन ट्रायडेंट या कराची बंदराच्या वेढ्यात निपात शामिल होती. त्यावेळी पाकिस्तानी लढाऊ नौकांच्या तांड्याशी दोन हात करीत असताना निपातने दोन एसएस-एन-२ स्टिक्स प्रक्षेपास्त्रे पाकिस्तानकडे रसद व दारुगोळा घेून जाणाऱ्या एमव्ही व्हीनस चॅलेंजर या जहाजावर सोडले व तीस बुडविली. या कामगिरीसाठी निपातवरील लेफ्टनंट कमांडर (मुख्याधिकारी) यांना वीर चक्र देण्यात आले होते.