महाराष्ट्रातील सह्याद्री डोंगररांगेत आंबोली घाट नावाचे चार घाटरस्ते आहेत. यापैकी सिंधुदुर्गातील आंबोली घाट अधिक प्रसिद्ध आहे.

आंबोली घाट

वैशिष्ट्ये संपादन

प्रचंड पाऊस, धबधबे, दाट जंगल आणि भरपूर विविध प्रकारची जैवविविधता आढळते. आंबोली घाटात दर वर्षी धबधबा पाहण्यासाठी खूप पर्यटक येतात. आंबोलीला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. (पर्जन्यमान ७५० सेंटिमीटर). आंबोलीमधील पारपोली गावाजवळचा धबधबा सर्वात मोठा आहे. आंबोलीजवळ नांगरतास हा प्रसिद्ध धबधबा आहे. येथील हिरण्यकेशी नदीचा उगम हे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील देवराई समृद्धपूर्ण  जैवविविधता संपन्न आहे.[१]

जैवविविधता संपादन

 
महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू

विविध प्रकारची बुरशी, बुरशीमुळे प्रकाशणारे लाकूड, उभयचर प्राणी, महाराष्टाचे राज्यफुलपाखरू व रानफुले या परिसरात पहायला मिळतात.[१]

कसे जाल संपादन

कोल्हापूर आणि सावंतवाडी ही लोहमार्गीय स्थानके येथे जाण्यास सोयीची ठरतात.

संदर्भ संपादन

  1. ^ a b जोशी मकरंद. "चिंबओली आंबोली (८. ६.२०१८)".