१८३१ ते १८३७ सालांदरम्यान अमेरिकेत अनेक मूळच्या अमेरिकन लोकांना जबरदस्तीने त्यांच्या मूळ निवासी क्षेत्रातून स्थलांतरित करून आत्ताच्या ओक्लाहोमा राज्यात हलविण्यात आले. हजारो किलोमीटरचा प्रवास पायी करविण्यात आला. यात सुमारे ४००० ते ६००० मूळच्या अमेरिकन लोकांचा मृत्यू झाला. या अमानुष घटनेला अश्रूंची पाऊलवाट असे म्हणतात. यात चेरोकी, क्रीक, सेमिनोल, चिकासॉ, चॉक्टॉ या जमातींना स्थलांतरित करण्यात आले.

अश्रूंची पाऊलवाट स्मारक
अश्रूंची पाऊलवाट स्मारक
चेरोकी वारसा केंद्र
चेरोकी वारसा केंद्र