अमेरिकन गॉथिक हे ग्रॅंट वुड या चित्रकाराचे एक प्रसिद्ध चित्र आहे. हे चित्र सद्ध्या आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो येथील संग्रहात मांडले आहे. 'अमेरिकन गॉथिक हाउस व त्यात राहणारी माणसे' ही या चित्रामागील प्रेरणा होती. [१] याचित्रात एक वृद्ध शेतकरी व त्याची घरकाम करणारी अविवाहित मुलगी दाखविली आहे.[२] या चित्रासाठी वुडची बहीण व त्यांचा दातांचा डॉक्टर मॉडेल म्हणून उभे राहिले होते. चित्रातील मुलगी १९व्या शतकातील कलोनियल अमेरिकेतील पेहराव करून आहे. या चित्रात त्या काळातील पुरूष व स्त्री त्यांच्या रूढ भूमिकांमध्ये दाखविले आहेत. पुरूषाच्या हातात तीन दातांचा कोयता (pitchfork) आहे जो शारिरिक कष्टाचे प्रतिक म्हणून दाखविला आहे, तर मुलीने फुला-फुलांचा स्वेटर घातला आहे.

अमेरिकन गॉथिक चित्र

हे चित्र २०व्या शतकातील सर्वात प्रसिद्ध चित्रांमधील एक आहे व अनेक माध्यमांमध्ये ते चित्र अथवा त्याची विडंबना वापरण्यात आली आहे.

संदर्भ संपादन

  1. ^ Fineman, Mia, The Most Famous Farm Couple in the World: Why American Gothic still fascinates., Slate,८ जून २००५
  2. ^ "About This Artwork: American Gothic". The Art Institute of Chicago. Archived from the original on 2010-05-28. २० जून २०१० रोजी पाहिले.